
संस्थेने या सर्व बाबींचे अवलोकन करून संजीवनी टॉडलर्सला अंतिम फेरीत प्रवेश दिला. अंतिम फेरीत सहा परीक्षकांनी व्हर्चुअल मिटींगद्वारे विविध प्रश्न विचारले.
कोपरगाव ः संजीवनी ऍकॅडेमी संचलित संजीवनी टॉडलर्स (कोपरगाव, येवला व शिर्डी)ला "इनोव्हेशनस फॉर करीकुलम फॉर प्री-स्कूल' या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यासाठी घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील 140 संस्था सहभागी झाल्या होत्या. या पुरस्कारामुळे संस्थेला राष्ट्रीय पातळीवर अव्वल संस्थेचा बहुमान मिळाल्याची माहिती संस्थेच्या संचालिका मनाली अमित कोल्हे यांनी दिली.
कोल्हे म्हणाल्या, की अभ्यासक्रमातील नवकल्पनांची रचना व त्याची प्रभावी अंमलबजावणी लक्षात घेऊन, बिझनेस वर्ल्ड एज्युकेशन या राष्ट्रीय संस्थेने "टॉप एज्युकेशन ब्रॅंडस्-2020' अंतर्गत घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत संस्थेने हे यश संपादन केले. संजीवनी टॉडलर्सने 3 ते 5 वयोगटातील विध्यार्थ्यांसाठी कोविड संकटात ऑनलाइन पद्धतीने राबविलेल्या क्लस्टर टिचिंग, कौशल्य विकास, नैतिक मूल्ये, कृतियुक्त अध्ययनपद्धती, विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन आदींचे पॉवर पॉईंट सादरीकरण पाठविले होते. विद्यार्थ्यांसाठी अन्य उपक्रमांची माहिती पाठवली होती.
संस्थेने या सर्व बाबींचे अवलोकन करून संजीवनी टॉडलर्सला अंतिम फेरीत प्रवेश दिला. अंतिम फेरीत सहा परीक्षकांनी व्हर्चुअल मिटींगद्वारे विविध प्रश्न विचारले. या सर्व कसोट्यात देशातील 140 संस्थांमधून संजीवनी टॉडलर्स अव्वल, तसेच प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. संजीवनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटस्चे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी संचालिका मनाली कोल्हे, प्राचार्या सुंदरी सुब्रमण्यम व शिक्षकांचा सत्कार केला.