
-सुहास वैद्य
कोल्हार : सोने व चांदीच्या दरात ऐतिहासिक विक्रमी वाढ झालेली असतानाही गुढीपाडवा या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या सणाच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पसंती दिसते. एक तोळा सोने व एक किलो चांदीचे दर गेल्या दोन-तीन महिन्यांत लाखाच्या आसपास पोहोचले आहेत. अशा परिस्थितीतही सराफ सुवर्ण झळाळीच्या अपेक्षेत आहेत. अशी परिस्थिती यंदा प्रथमच उद्भवली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.