
तळेगाव दिघे: दमणगंगा - वैतरणा - गोदावरी नदीजोड प्रकल्प हा राज्याच्या पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील दुष्काळपीडित तळेगाव दिघे व निमोण गटाचा नदीजोड प्रकल्प कमांड झोनमध्ये समावेश करावा, असे साकडे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निमोण ग्रामपंचायतचे सरपंच संदीप देशमुख यांनी घातले.