
संगमनेर : ‘माझ्यात आणि मामांमध्ये कुठेही दुरावा नाही. मी मामांच्या पुढे जाऊ शकत नाही, जाणारही नाही. हे माझे आयुष्यभराचे तत्त्व आहे’, अशा भावनिक शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या नात्यांची परखड मांडणी केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात त्यांचे सख्खे मामा आहेत, याचा उल्लेखही त्यांनी विशेषत्वाने केला.