
Digital Initiative “Satyanapan App” Highlights Efficiency in Ahilyanagar, Gets National Spotlight
Sakal
अहिल्यानगर: शासनाच्या विविध सामाजिक योजनांचा लाभ घेण्यासाठी वयोवृद्ध, विधवा, तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना दरवर्षी ‘हयातीचे प्रमाणपत्र’ सादर करावे लागते. यासाठी त्यांना तहसील, पंचायत समिती किंवा इतर शासकीय कार्यालयांत वारंवार चकरा माराव्या लागत असत. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाने विकसित केलेल्या ‘लाभार्थी सत्यापन ॲप’ मुळे ही प्रक्रिया आता घरबसल्या सुलभ झाली आहे. जिल्ह्यातील ३८ हजार ८०२ लाभार्थ्यांपैकी ११ हजार ३७२ लाभार्थ्यांनी या प्रणालीचा लाभ घेतला आहे.