सावित्रीच्या लेकींचा कोरोनाशी लढा 

corona 19
corona 19
Updated on

नगर तालुका : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांच्याच मनात आजही भीतीचे वातावरण कायम आहे. शहरासह ग्रामीण भागात प्रत्येक जण खबरादारी घेत आहे. मात्र, तीन हजार महिला कर्मचाऱ्यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळून तालुक्‍यात कोरोनाशी लढा दिला. 

सावित्रीच्या लेकींच्या योगदानामुळे तालुक्‍यात कोरोना आटोक्‍यात राहिला. कोरोनाने जगभर हाहाकार उडवून दिला असून, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. हे काम जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर अशा अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांमार्फत सुरू आहे.

नगर तालुक्‍यातील 105 गावांमध्ये सर्वांचीच कामगिरी चांगली राहिली. मात्र, त्यात महिलांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तीन हजार महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुक्‍यातील 105 गावांची कमान सांभाळली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या 570 शिक्षिका, 1161 अंगणवाडीसेविका व 251 परिचारीका, 27 ग्रामसेवक, चार ग्रामविकास अधिकाऱ्यांसह तालुका वैद्यकीय अधिकारी, तसेच आरोग्य, पोलिस खात्यातील 300 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

 
तालुक्‍यातील प्रत्येक जबाबदार महिलेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरुषाच्या बरोबरीने काम केले. यात महिला सरपंच, शिक्षिका, आरोग्यसेविका, आशा वर्कर, अंगणवाडीसेविका, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. 
- सविता मेहेत्रे, सरपंच, अकोळनेर 
 
महिलांनी प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांवर जाऊन कोरोनाबाबत जनजागृती केली. बाहेरगावाहून आलेल्यांना संस्थात्मक विलगीकरण, त्यांची आरोग्य तपासणी, बाधित रुग्णांना रुग्णालयात पोचवणे या कामांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामध्ये आरोग्यसेविकांसह आशा, अंगणवाडीसेविकांची मदत महत्त्वाची ठरली. 
- डॉ. ज्योती मांडगे, तालुका आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com