
शिर्डी : शिर्डीतला ग्रो मोअर कंपनीचा घोटाळा साडेतीनशे कोटी रुपयांचा आहे. फसविलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी आपला प्रयत्न आहे. शिर्डीसह अन्य काही जिल्ह्यातील तीन ते चार हजार गुंतवणूकदारांचे पैसे त्यात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. व्याप्ती आणखी मोठी होण्याची शक्यता आहे. त्याचे दलाल म्हणून कार्यरत असलेले साईसंस्थानचे चार कर्मचारी निलंबित करण्यात आले.