‘मी कौन बनेगा करोडपती’मधून बोलतोय तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली आहे, असे आमिष आरोपीने अरुणे यांना दाखविले. त्यानंतर त्यांचा विश्वास मिळविला.
अहिल्यानगर : ‘कौन बनेगा करोडपती’मधून (Kaun Banega Crorepati) बोलतोय, तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली आहे, असे सांगत ठाणे येथील ठकाने अहिल्यानगर येथील एकाची एक लाख ३३ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. दरम्यान, सायबर पोलिसांनी (Cyber Police) ठाणे येथे जाऊन या ठकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. फैसल ईकबाल मेमन (रा. मेमन मंजिल, पीर रोड, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.