esakal | पुणे, नाशिक, धुळे, कल्याणला जाण्यासाठी नगरमधून यावेळेत आहेत एसटी बस
sakal

बोलून बातमी शोधा

Schedule of ST from Ahmednagar to Pune Nashik announced

कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर केल्यापासून एसटीची सेवा ठप्प झाली. मात्र, आता सरकारने एसटीला आंतरजिल्हा प्रवाशी वाहतुकीला परवानगी दिली आहे.

पुणे, नाशिक, धुळे, कल्याणला जाण्यासाठी नगरमधून यावेळेत आहेत एसटी बस

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर : कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर केल्यापासून एसटीची सेवा ठप्प झाली. मात्र, आता सरकारने एसटीला आंतरजिल्हा प्रवाशी वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे अहमदनगर येथील तारकपूर आगारातून नियमित बसच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यात कल्याण, नाशिक, पुणे, धुळे आदी ठिकाणी बस सोडण्यात येत आहेत, अशी माहिती आगार व्यवस्थापक अविनाश कल्हापुरे यांनी दिली.

कोरोनामुळे एसटीची सेवा 22 मार्चपासून पूर्ण बंद होती. 22 मेपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सुरू करण्यास परवानगी मिळाली. आता 20 ऑगस्टपासून एसटीला आंतरजिल्हा प्रवाशी वाहतुकीला परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना, बसमध्ये 22 प्रवाशी व प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक आहे. सर्व सूचनांचे पालन करीत एसटीने आपली सेवा सुरू केली आहे.

तारकपूर आगारातून कल्याणसाठी पाच, नाशिकसाठी पाच, पुण्यासाठी पाच, धुळे एक, संगमनेरसाठी दोन, कोपरगावसाठी दोन, पाथर्डीसाठी दोन, अशा एकूण 22 फेऱ्या सुरू केल्या आहेत. या सर्व फेऱ्या सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेदरम्यान होणार आहेत. दर एका तासाने कल्याण, पुणे, नाशिक व पुण्यासाठी बस सुटणार आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी बस सुरू केल्या असून, सर्व बस सॅनिटायईझ करूनच सोडल्या जात असल्याचे कलापुरे यांनी सांगितले.

तारकपूर आगाराने प्रवाशांच्या सेवेसाठी खालील वेळेत बस सुरु आहेत
१) अहमदनगर -कल्याण=०७.००; ०८.००; ०९.०० ; १०.००; ११.००
२)अहमदनगर-नाशिक=०८.००; ०९.००; १०.००; ११.००; १२.००
३)अहमदनगर-पुणे=०७.००; ०८.००;   ०९.००; १२.००; १४.००
४)अहमदनगर-धुळे=०७.००
५)अहमदनगर-संगमनेर=०७.००; १३.३०
६)अहमदनगर-कोपरगाव=०७.३०; १४००
७)अहमदनगर-पाथर्डी=०८.३०; १३.००

संपादन : अशोक मुरुमकर