
देवदैठण : शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा असतो. मात्र, पिंपरी कोलंदर (ता. श्रीगोंदे) येथील चौफुला प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले. जागामालकाने शाळा भरविण्यास विरोध केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठत तेथे ठिय्या दिला.