देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

अनेक फेसबुक वापरकर्त्यांकडून संगणक, मोबाईल आदी साधनांद्वारे अत्यंत खालच्या पातळीवर जावून अश्लिल शब्दप्रयोग, जीविता,स धोका निर्माण होईल अशी टिपण्णी करणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत.

संगमनेर ः माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जीवीतास धोका होईल अशा प्रकारची टिपण्णी फेसबुकच्या माध्यमातून टाकल्याच्या विरोधात संगमनेर शहर भाजपतर्फे संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिलीप बोचे यांनी फेसबुक अकाऊंटद्वारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जीवीतास धोका निर्माण होईल अशी आक्षेपार्ह, अपमानास्पद व बदनामी करण्याच्या उद्देशाने ही पोस्ट केली आहे.

हेही वाचा - अकोल्याच्या भूमिपूत्र पोलिलास नाशिकमध्ये कोरोना

अनेक फेसबुक वापरकर्त्यांकडून संगणक, मोबाईल आदी साधनांद्वारे अत्यंत खालच्या पातळीवर जावून अश्लिल शब्दप्रयोग, जीविता,स धोका निर्माण होईल अशी टिपण्णी करणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत.

या प्रकरणी दिलीप बोचे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रार अर्जात पुराव्यांसह करण्यात आली आहे.

या वेळी भारतीय जनता पार्टी संगमनेरचे ज्येष्ठ नेते राम जाजु, संगमनेर शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, दिनेश सोमाणी, भारत गवळी, सुनील मानवतकर आदी उपस्थित होते.

विखे पाटलांचीही बदनामी
कालच भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात बदनामी पोस्ट टाकणाऱ्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले होते.परंतु लॉकडाउन असल्याने त्यांनी आंदोलन केले नाही. परंतु संबंधित व्यक्तीविरोधात  गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis's notoriety on Facebook