
-हरिभाऊ दिघे
तळेगाव दिघे : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज दिंडी व पालखी सोहळ्याचे तळेगाव दिघे येथे मंगळवारी (ता. १७) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आगमन होताच पदाधिकारी व ग्रामस्थांनी फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत उत्साहात स्वागत केले. हाती भगव्या पताका घेत, हरिनामाचा जयघोष भाविक भक्तीचा महासागर लोटल्याचे दिसून आले.