पिकांच्या नुकसानीच्या भरपाईपोटी आला दुसरा हप्ता

अमित आवारी
Tuesday, 12 January 2021

खरिपाच्या काळात शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आले.

नगर ः अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी दुसऱ्या हप्त्यातील भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 
खरिपाच्या काळात शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आले.

नुकसानीचा आढावा घेऊन शासनाने नगर जिल्ह्यासाठी 73 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीचा पहिला हप्ता वितरित केला होता. मात्र, त्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना दोन महिने वाट पाहावी लागली.

अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून, दुसऱ्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांना 73 कोटी 50 लाख 13 हजार रुपयांची भरपाई वितरित करण्यात आली आहे.

हेही वाचा - पाथर्डीत सुनेला सासूचेच आव्हान, आमदार राजळे जाऊबाईंच्या पाठिशी 

राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून हेक्‍टरी 6800 रुपये, तर बहूवार्षिक पिकांसाठी हेक्‍टरी 18 हजार रुपये अनुदान, तसेच वाढीव दराने शेतीपिकांसाठी 3200 रुपये प्रतिहेक्‍टरीनुसार 50 कोटी 38 हजार रुपये, तर बहुवार्षिक पिकांसाठी 7 हजार रुपये प्रतिहेक्‍टरीनुसार 23 कोटी 49 लाख 75 हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. हा दुसरा व अंतिम हप्ता असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The second installment came to compensate for the loss of crops