esakal | पाथर्डीत सुनबाईंना सासूचेच आव्हान, आमदार राजळे जाऊबाईंच्या पाठिशी
sakal

बोलून बातमी शोधा

Mother-in-law's match against Soon at Pathardi

राजकीय पक्षापेक्षा स्थानिक गट, व्यक्ती, भावकी, जात व धर्म असे अनेक पदर निवडणुकीला असतात. आर्थिक प्रबळ असलेल्या उमेदवाबाबत जनतेमध्ये चीड निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

पाथर्डीत सुनबाईंना सासूचेच आव्हान, आमदार राजळे जाऊबाईंच्या पाठिशी

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी ः गावकीच्या निवडणुकीत जे फंडे वापरले जातात, ते कदाचित इतर कोणत्याच निवडणुकीत वापरले जात नसावेत. इथली मतविभाजनाची किंवा बेरजेची गतिणतं फार वेगळी असतात. मेट्रो सिटीत बसणारा कोणताही राजकीय चाणक्य त्याचे विश्लेषण करू शकणार नाही. पाथर्डीतील काही लढती तर फारच काट्याच्या आहेत. आणि नात्यातही लढल्या जात आहेत.

७५ ग्रामपंचायतीत प्रचार शिगेला

तालुक्‍यातील 75 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. अटीतटीच्या लढतीमध्ये अकोला, मिरी, माणिकदौंडी, कासार पिपंळगाव, चितळी येथे दुरंगी लढती लक्षवेधी ठरत आहेत. कासारपिंपळगाव येथे आमदार मोनिका राजळे यांच्या जाऊबाई सरपंच मोनाली राजळे यांची लढत प्रतिष्ठेची आहे. या गावात मोनाली राजळे व त्यांच्या चुलत सासू मंगल राजळे या दोघी सासू-सुन यांच्यात चुरशीची लढाई होत आहे. 

हेही वाचा - पेट्रोल पंपाला चपलांचा हार

अकोला येथे अनिल ढाकणे व संभाजी गर्जे यांच्यातील लढत काट्याची होईल. माणिकदौंडी ग्रामपंचायतीमध्ये समीर पठाण व आलमगीर पठाण यांच्यातील निवडणूक अटीतटीची आहे. 219 प्रभागातील 575 सदस्यांच्या जागेसाठी एक हजार 321 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

राजकीय पक्षापेक्षा स्थानिक गट, व्यक्ती, भावकी, जात व धर्म असे अनेक पदर निवडणुकीला असतात. आर्थिक प्रबळ असलेल्या उमेदवाबाबत जनतेमध्ये चीड निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

अकोल्यातील संघर्षही पारंपरिक

अकोला गावात राजळे ढाकणे समर्थकात संघर्ष आहे. तेथे अनिल ढाकणे व संभाजी गर्डे यांच्यातील लढत काट्याची होईल. माणिकदौंडी ग्रामपंचायतीमध्ये समीर पठाण व आलमगीर पठाण यांच्यातील निवडणूक अटीतटीची होत आहे. 

चितळीत ताठे विरूद्ध ताठे

चितळी येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे व भाजपाचे सुभाष ताठे या पारंपरिक विरोधकामध्ये या वेळी दिलजमाई झाली आहे. दोघांनी मिळुन केलेल्या पॅनलला अशोक ताठे यांनी कडवे आव्हान दिले आहे. सुसरे गावात दादापाटील कंठाळी व सहकाऱ्यांच्या पॅनलने पाच जागा बिनविरोध मिळविल्या आहेत.

निपाणी जळगावमधे बंडू पठाडे, नितीन गर्जे, वसंत बोर्डे यांच्या पॅनलसमोर अजय रक्ताटे, बाबासाहेब चौधर यांच्या पॅनलने चांगलाच संघर्ष उभा केला आहे. खरवंडीत जुने नवे असा वाद असून, कोण बाजी मारतो, याकडे लक्ष लागले आहे.

फुंदेटाकळी गावात भिमराव फुंदे, कुमार फुंदे, संजय फुंदे यांच्या पॅनलचा वासुदेव फुंदे व निवृत्ती फुंदे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.