esakal | केतन साळुंके यांची सशस्त्र सीमा दलात सहाय्यक कमांडन्टपदी नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

selection of Ketan Salunke as Assistant Commandant in the Armed Border Force

भानसहिवरे येथील केतन कैलास साळुंके यांची यूपीएससीच्या परीक्षेत यश संपादन केल्यानंतर भोपाळ येथील सशस्त्र सीमा दलामध्ये सहायक कमांडन्टपदी नियुक्ती झाली आहे.

केतन साळुंके यांची सशस्त्र सीमा दलात सहाय्यक कमांडन्टपदी नियुक्ती

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : तालुक्यातील भानसहिवरे येथील केतन कैलास साळुंके यांची यूपीएससीच्या परीक्षेत यश संपादन केल्यानंतर भोपाळ येथील सशस्त्र सीमा दलामध्ये सहायक कमांडन्टपदी नियुक्ती झाली आहे.

मध्यप्रदेश भोपाळ येथील सशस्त्र सीमा बल अकादमीमध्ये कठीण असे ५२ आठवडयांचे प्रशिक्षण हिमतीने पूर्ण केल्याबद्दल केतन साळुंके यांची २३ व्या बॅचमध्ये सहायक कमांडन्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

केतन साळुंके यांच्या निवडीबद्दल त्यांचे सशस्त्र सीमा बल अकादमीचे भारतीय पोलिस सेवा महानिरीक्षक कुमार राजेश चंद्रा यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.

भोपाळ येथील सशस्त्र सीमा बल अकादमीत देश सेवेत दाखल झालेले केतन साळुंके हे भानसहिवरे मुळ रहिवासी व पुणे येथे स्थायिक असलेले कैलास साळुंके यांचा मुलगा तर भानसहिवरेचे माजी सरपंच व नेवासे बाजार समितीचे माजी उपसभापती देविदास साळुंके यांचे पुतणे आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर