रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी रामदास काळदाते, सचिवपदी जगताप

रोटरी क्लब
रोटरी क्लब

कर्जत : येथील नगर पंचायतीने माझी वसुंधरा स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. रोटरी क्लब त्या यशाचा एक अंश आहे. कर्जत शहर कूस बदलीत असून पर्यावरण समृद्ध गाव ही नवी ओळख पुढे येते आहे. कोरोना महामारीतसुद्धा सर्वांनी जनसेवा हीच ईशसेवा मानीत एकजुटीने कार्य चालूच ठेवले, असे प्रतिपादन शाखा संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काळदाते यांनी केले.

येथील रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या विविध कामांच्या माहिती पुस्तिका, मागील वर्षीच्या कामकाजाचा आढावा तसेच नवीन पदाधिकारी निवड बैठकीत ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष प्रा. विशाल मेहेत्रे, सचिव घनश्याम नाळे, नितीन देशमुख, गणेश जेवरे, भाऊ सुरवसे, अक्षय राऊत, सदाशिव फरांडे, संदीप गदादे, राहुल खराडे, उत्तम मोहोळकर, सुरेश नहार, नितीन तोरडमल, ओंकार तोटे, दयानंद पाटील, रवींद्र राऊत, सचिन धांडे, सचिन गोरे, राजेंद्र सुपेकर, अभय बोरा यांच्यासह सर्व सभासद उपस्थित होते. (Selection of office bearers of Rotary Club in Karjat taluka)

रोटरी क्लब
मी पस्तीस वर्षे हटत नसतो, आमदार लंकेंनी सांगितला राजयोग

काळदाते म्हणाले, रोटरी या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून समाज विधायक कामे करता आली. परिपूर्ण सिटीकडे कर्जतचे आश्वासक पाऊल पुढे पडते आहे. पक्ष व राजकारण विरहित ही संघटना असल्यानेच विविध क्षेत्रातील नागरिक यात सहभागी होत आहेत.

प्रा.विशाल मेहेत्रे म्हणाले, मला संस्थेचे शाखा अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. थोडे दडपण होते. मात्र, सर्वांना समवेत घेत चांगले काम करता आले याचे समाधान आहे. या वेळी संघटनेच्या पुढील कार्यकाळ २०२१-२२ साठी नूतन अध्यक्षपदी रामदास काळदाते तर सचिवपदी राजेंद्र जगताप यांची निवड करण्यात आली. या वेळी राजेंद्र सुपेकर यांनी नवीन पदाधिकाऱ्यां शुभेच्छा दिल्या. घनश्याम नाळे यांनी आभार मानले.

कोविडमधील काम

कोरोना महामारीत रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीने आपले भरीव योगदान दिले. त्या मध्ये पॅरामेडिकल स्टाफ डॉक्टर यांना लागणारे मास्क, कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांसाठी चार्जिंग पॉइंट, कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण संदर्भात जनतेमध्ये जनजागृती करणे, फ्रॅक्शनेशन सेंटर येथे सेल्फी पॉइंट निर्माण करणे यासह विविध विधायक उपक्रम राबविण्यात आले आहेत.(Selection of office bearers of Rotary Club in Karjat taluka)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com