प्रतापपूरच्या कन्येची भारताच्या अण्विक विभागात निवड

सतीश वैजापूरकर
Tuesday, 22 September 2020

मुंबईत जीवन बिमा निगममध्ये विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना तिने, भारत सरकारच्या अण्विक परमाणू विभागातील पदासाठी झालेल्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवून गुणवत्तेच्या जोरावर आपले स्थान पक्के केले आहे.

संगमनेर ः संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील प्रतापपूर येथील मूळ रहिवाशी असलेल्या मुरलीधर आंधळे यांची कन्या धनश्री हिची गुणवत्तेच्या जोरावर भारत सरकारच्या आण्विक परमाणू विभागात निवड झाली आहे.

प्रतापपूर येथील मुरलीधर अनाजी आंधळे मुंबई अग्निशमन विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची कन्या धनश्री हिने नेरुळच्या वीर जिजामाता तंत्रशिक्षण संस्थेतून पदविका, रामराव आदिक तंत्रशिक्षण संस्थेतून इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरींगची पदवी व नेरुळच्या डी. वाय. पाटील महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

मुंबईत जीवन बिमा निगममध्ये विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना तिने, भारत सरकारच्या अण्विक परमाणू विभागातील पदासाठी झालेल्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवून गुणवत्तेच्या जोरावर आपले स्थान पक्के केले आहे.

यामुळे तिची मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात उच्च पदावर नियुक्ती झाली आहे. 

या यशाबद्दल माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, शालिनी विखे पाटील, शिवनेरी उद्योग समुहाचे भगवानराव इलग आदिंसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selection of Pratappur's daughter in the Atomic Division of India