आय लव्ह कर्जत, टाकाऊ वस्तूंपासून बनवला सेल्फी पॉईंट

नीलेश दिवटे
Friday, 15 January 2021

या सेल्फी पॉईंट साठी शहरातून निरूपयोगी टायरचे संकलन करण्यात आले होते. त्यांना रंग देऊन येथील दादा पाटील महाविद्यालयांच्या जवळ सेल्फी पॉईंट बनविण्यात आला आहे.

कर्जत: कर्जत शहरात एकेकाळी प्यायच्या पाण्याचेही वांदे असायचे. परंतु आता वातावरण बदलंय. एक नव्हे तर दोन दोन गार्डन झाल्यात. स्वच्छ सर्व्हेण अभियानात सहभागी झाल्याने चेहराही स्वच्छ आणि सुंदर होतोय. सर्वच पक्षांच्या नेत्यांचे यासाठी योगदान मिळतेय.

आम्ही कर्जतचे सेवेकरी परिवाराच्या वतीने शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. टाकऊमधून टिकाऊ असा सेल्फी पॉइंट उभा करण्यात आला आहे. तो शहरातील युवा वर्गासह जेष्ठांच्या आवडीचा बनलाय. छायाचित्र घेण्यासाठी चढाओढ लागली आहे. 

हेही वाचा - मुळा धरणातून आवर्तन सुटलं बरं का

कर्जत नगरपंचायतीने स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 मध्ये सहभाग घेतला आहे. शहराला या अभियानात अग्रस्थानी नेण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा या स्पर्धेतर्गत शहरात आम्ही कर्जतचे सेवेकरी या विविध मंडळांनी शहराच्या मुख्य रस्त्यावर टाकाऊ वस्तुंना एकत्र करीत त्यापासून टिकाऊ असा सेल्फी पॉईंट बनविला आहे.

नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संल्पनेतून सुरू झालेल्या आम्ही कर्जतचे सेवेकरी या अभियानात महासंग्राम युवा मंच, गुरुवार क्लब, कृषी पदवीधर,युवाशक्ती संघटना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, निगाहे करम ग्रुप, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ, संत गोरोबा काका मित्र मंडळ, बेलेकर काॅलनी मित्र मंडळ, गवंडे गल्ली मित्र मंडळ, संत सेना महाराज तरूण मंडळ, आझाद तरुण मंडळ, यासीन नगर मित्र मंडळ, यांच्या वतीने स्वछता अभियाना बरोबर झाडांना रंग देणे, भींंतीवर घोषवाक्य रंगविणे, टाकाऊ वस्तू मधून टिकाऊ वस्तू उभारणे आदी कामातून आपल्या संकल्पना राबविल्या जात आहेत.

या सेल्फी पॉईंट साठी शहरातून निरूपयोगी टायरचे संकलन करण्यात आले होते. त्यांना रंग देऊन येथील दादा पाटील महाविद्यालयांच्या जवळ सेल्फी पॉईंट बनविण्यात आला आहे. आकर्षक रंगात रंगविलेले टायर एकमेकाला जोडून त्यावर स्वच्छ सर्व्हेक्षण 2021, कर्जत शहरात आपले सहर्ष स्वागत, आम्ही कर्जतचे सेवेकरी क्लब, आय लव्ह कर्जत, व स्वच्छ कर्जत सुंदर कर्जत आदी घोष वाक्य लिहिले आहेत.

या माध्यमातून शहरात पहिला सेल्फी पॉईट उभारला गेला असून शहराच्या सुंदरते मध्ये यामुळे विशेष भर पडणार आहे. 

शहर स्वच्छता ही व्यापक स्वरूप घेत लोकचळवळ बनली आहे. तसेच दिवसेंदिवस त्यास वाढता प्रतिसाद मिळत आहे. शहरातील पहिल्या वहिल्या सेल्फी पॉईंटला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selfie point set up at Karjat