Ahilyanagar Crime
sakal
अहिल्यानगर: रिसोड (जि. वाशीम) येथून ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण करून दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा नगरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून दोन आरोपींना ताब्यात घेतले. राहुल दिलीप म्हस्के (वय ३२, रा. जालना), सतीश ऊर्फ बालू विनायक जाधव (वय २९, रा. जालना) अशी आरोपींची नावे आहेत. अपहरण झालेले सीताराम नारायण खानजोडे (वय ६०, रा. आसेगाव, पेन, जि. वाशीम) यांची पोलिसांनी सुटका केली. स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली.