
राळेगणसिद्धी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन हजारे यांनी आज सकाळी मतदान केले.
राळेगणसिद्धी (अहमदनगर) : मतदानाचा हक्क श्रेष्ठ हक्क आहे. सुदृढ व निकोप लोकशाहीसाठी राज्यातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
राळेगणसिद्धी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन हजारे यांनी आज सकाळी मतदान केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना हजारे म्हणाले, लोकांची, लोकांकडून व लोकांसाठी चालवलेली अशी आपली लोकशाही आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा मतदानाचा हक्क सर्वश्रेष्ठ आहे. मी माझा मतदानाचा हक्क बजावल. सर्व मतदारांनी ही आपल्या मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. पसंतीचा उमेदवार नसेल तर नोटाचे बटन दाबा, परंतु प्रत्येकाने मतदानाचा आपला हक्क बजवावा, असेही आवाहन हजारे यांनी केले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राळेगण सिद्धी ग्रामपंचायत निवडणूक केंद्रावर आज शांततेत मतदान सुरू झाले. सकाळी 11. 30 वाजेपर्यंत 30 टक्के मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरची सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिली आहे. सोशल डिस्टन्स पाळत व मास्क लावून मतदार मतदानाला येताना येत आहेत. तहसिलदार ज्योती देवरे यांनी त्यांच्या पथकासह राळेगणसिद्धी येथील मतदान केंद्राला भेट दिली.