शरद पवार सत्तेत नाहीत; महाविकास आघाडी सरकार म्हणजे चलती का नाम गाडी

अशोक मुरूमकर 
Sunday, 8 November 2020

अण्णा हजारे म्हणाले, आजचे राजकारण हे ध्येयवादी नाही. यात दुरदृष्टी राहिलेला नाही. फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे आहे. निवृत्तीबद्दल बोलताना अण्णा म्हणाले, वयाच्या २५ व्या वर्षी मला महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा मिळाली. तेव्हापासून गाव व समाज याची सेवा करायची असे व्रत मी घेतले.

अहमदनगर : ‘महाविकास आघाडी सरकार म्हणजे चलती का नाम गाडी’, असं विधान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.

अण्णा हजारे म्हणाले, आजचे राजकारण हे ध्येयवादी नाही. यात दुरदृष्टी राहिलेला नाही. फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे आहे. निवृत्तीबद्दल बोलताना अण्णा म्हणाले, वयाच्या २५ व्या वर्षी मला महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा मिळाली. तेव्हापासून गाव व समाज याची सेवा करायची असे व्रत मी घेतले. दुसऱ्या दिवशी झालेल्या ग्रामसभेत नवीन कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकायची असे सांगितले होते. कार्यातून मुक्त व्हायचे असं नाही. 

मंदिर उघडण्याबाबत हजारे म्हणाले, यावर सध्या राजकारण सुरु आहे. एकीकडे सिनेमागृह सुरु आहेत. मात्र, मंदिरे उघडली जात नाहीत. मंदिरात मी राहतो. पण ईश्वर रंजल्या गांजल्यात पाहतो. सरकार बार सुरु करते पण मंदिर उघडत नाहीत. अन्‌ दुसरे फक्त मंदिरे उघडायला सांगत आहेत, असा टोलाही त्यांनी भाजपचे नाव न घेत लगावला. अध्यात्मशिवाय माणसात बदल होणार नाही, असेही ते म्हणाले.
 
पुढे बोलताना हजारे म्हणाले, हे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी असं आहे. रुख गया तो गटारा. काय समाजाचे हित असाही प्रश्‍न त्यांनी केला. साखर कारखान्याचे काय झाले असाही त्यांनी प्रश्‍न केला. गेल्या सरकारवेळी आंदोलने झाली असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्यावेळी मी १७ वेळा पत्रव्यवहार केला. त्यावर मुख्यमंत्र्यांना स्वत: राळेगणसिद्धीला यावे लागले. त्यातून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अश्‍वासनानुसार लोकायुक्त कायद्यासाठी ड्राफटिंग तयार झाले. हा क्रांतीकारक कायदा आहे, असेही ते म्हणाले.

आताच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना क्लेअर झाल्यावर ॲक्शन घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांना  तुम्ही पत्र का लिहीत नाहीत असा प्रश्‍न विचारल्यानंतर शरद पवार हे सत्तेत नाहीत त्यांच्याकडे कोणतेही घटनात्मक पद नाही. त्यामुळे त्यांना पत्र लिहीले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior social activist Anna Hazare said that Mahavikas Aghadi government is a moving vehicle