esakal | ऑनलाइन योग स्पर्धेसाठी सातशे स्पर्धकांची नोंदणी

बोलून बातमी शोधा

Seven hundred contestants have registered for the online yoga competition}

मागील वर्षी केंद्र सरकारच्या खेल मंत्रालयाने योगासनांना राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता दिली. योगासनांच्या प्रचार व प्रसारासाठी स्वामी रामदेव यांच्या नेतृत्त्वाखाली आंतरराष्ट्रीय योगासन स्पोर्टस्‌ फेडरेशनची स्थापनाही करण्यात आली.

ऑनलाइन योग स्पर्धेसाठी सातशे स्पर्धकांची नोंदणी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमनेर (अहमदनगर) : केंद्र सरकारच्या खेल मंत्रालयाच्या मान्यतेने राष्ट्रीय योगासन स्पोर्टस्‌ फेडरेशनतर्फे राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाइन स्पर्धेसाठी राज्यभरातून सातशेहून अधिक स्पर्धकांनी नाव नोंदणी केली असल्याची माहिती राष्ट्रीय योगासन स्पोर्टस्‌ फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मागील वर्षी केंद्र सरकारच्या खेल मंत्रालयाने योगासनांना राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता दिली. योगासनांच्या प्रचार व प्रसारासाठी स्वामी रामदेव यांच्या नेतृत्त्वाखाली आंतरराष्ट्रीय योगासन स्पोर्टस्‌ फेडरेशनची स्थापनाही करण्यात आली. त्यानंतर संगमनेरमध्ये ऑनलाइन पंच प्रशिक्षणाचा तीन दिवसांचा कार्यक्रमही घेण्यात आला होता. त्यानंतर राज्यनिहाय ऑनलाइन योग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे अंतिम सामने 14 मार्च रोजी होणार आहेत. स्पर्धेसाठी राज्य असोसिएशनचे अध्यक्ष बापू पडाळकर, सचिव डॉ. संजय मालपाणी व संयोजक सतीश मोहगावकर यांच्यासह पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.