दौंड-मनमाड मार्गावरील रेल्वे अपघातात ४० मेंढ्या ठार

गौरव साळुंके
Friday, 7 August 2020

रेल्वे इंजिनच्या धडकेत रेल्वेपटरी ओलांडत असलेल्या ४० मेंढ्या ठार झाल्याचा अपघात वाकडी (ता. राहता) शिवारात नुकताच घडला. दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील वाकडी (ता. राहता) शिवारातील यशवंतबाबा चौकी परिसरातील भुयारी मार्गासमोरुन मेंढपाळ मेंढ्या चारत होता. सदर मेंढ्या रेल्वेपटरी ओलांडताना समोरुन आलेल्या रेल्वे इंजिनच्या जोराच्या धडकेत ४० जागीच ठार झाल्या.

श्रीरामपुर (नगर) : रेल्वे इंजिनच्या धडकेत रेल्वेपटरी ओलांडत असलेल्या ४० मेंढ्या ठार झाल्याचा अपघात वाकडी (ता. राहता) शिवारात नुकताच घडला. दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील वाकडी (ता. राहता) शिवारातील यशवंतबाबा चौकी परिसरातील भुयारी मार्गासमोरुन मेंढपाळ मेंढ्या चारत होता. सदर मेंढ्या रेल्वेपटरी ओलांडताना समोरुन आलेल्या रेल्वे इंजिनच्या जोराच्या धडकेत ४० जागीच ठार झाल्या.

गेल्या काही महिन्यांपुर्वी परिसरात असाच अपघात घडला होता. नुकत्याच झालेल्या पावसामुळे यशवंतबाबा भुयारी पुलाखाली पाणी साचल्याने मेंढपाळ ५० मेंढ्या घेऊन रेल्वेपटरी ओलांडताना अपघात घडला. सदर इंजिन विना रेल्वे डब्याचे असल्याचे स्थानिक नागरीकांनी सांगितले. अपघातात ४० मेंढ्याचा मृत झाल्याने मेंढपाळाची मोठी आर्थिक हानी झाली आहे. सदर ठिकाणी रेल्वे विभागाने भुयारी पुल नुकताच उभारला असून पावसाचे पाणी पुलाखाली साचल्याने नागरीकांना जीव धोक्यात घालून नाईलाजाने जवळील रेल्वेपटरी ओलांडावी लागते.

त्यामुळे रेल्वे पुलाखालील पावसाचे पाणी काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. तसेच सदर मेंढपाळाला नुकसान भरपाई द्यावीत, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहेत. याप्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Several sheep died in a train accident on Daund Manmad route at Shrirampur