मंत्री गडाख गटाच्या शहीदाबी पठाण यांची नेवासे नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेविकापदी निवड

सुनील गर्जे
Wednesday, 2 December 2020

नेवासे नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेविकापदी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाच्या शहीदाबी ईलायतखान पठाण यांची बिनविरोध निवडी झाली आहे.

नेवासे (अहमदनगर) : नेवासे नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेविकापदी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाच्या शहीदाबी ईलायतखान पठाण यांची बिनविरोध निवडी झाली आहे.

मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या नेवासे नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक झाली. अर्ज स्वीकारण्याच्या वेळेत पठाण यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांनी पठाण यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी व प्रभारी मुख्याधिकारी गरकळ उपस्थीत होते.

निवड जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित स्वीकृत नगर सेविका शहीदाबी पठाण यांचा मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर हयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मार्केट कमिटीचे सभापती कडूबाळ कर्डीले, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, अँड. एम. आय. पठाण, सतीश पिंपळे, गटनेते लक्ष्मण जगताप, असिफ पठाण आदी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देतांना शहीदाबी पठाण म्हणाल्या, मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत पाटील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासासाठी आपण काम करणार आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahidabi Pathan elected as sanctioned corporator of Nevase Nagarpanchayat