
सोनई: शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे शनिशिंगणापूर येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. पोलिसांनी आज देवस्थानच्या विश्वस्थांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते, सायंकाळीपर्यंत कोणीही आले नसल्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी सांगितले.