
-विनायक दरंदले
सोनई : ऑनलाइन पूजेच्या नावाखाली झालेल्या ॲप घोटाळ्याची धुळवड खाली बसत नाही, तोच गैरहिंदू ११४ कर्मचारी निलंबित केल्याने एका रात्रीत शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्ट राज्यात नव्हे तर देशात चर्चेत आले आहे. डिसेंबर २०२५च्या अखेरीस विद्यमान विश्वस्त मंडळाची मुदत संपत असल्याने पुढील सहा महिने सर्वांसाठी आरोपांचे बाण झेलण्यासाठी अग्निपरीक्षा राहील, एवढे मात्र नक्की.