esakal | शनिदेवाला गाठी-कडे अर्पण, गंगाजलाने अभिषेक
sakal

बोलून बातमी शोधा

Shanimurti was anointed by Gangajala

कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून देवस्थान ट्रस्टने गुढीपाडवा यात्रा,कावड सोहळा व उदासी महाराज पारायण सप्ताह रद्द केला होता.

शनिदेवाला गाठी-कडे अर्पण, गंगाजलाने अभिषेक

sakal_logo
By
विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर): 'सुर्यपुत्र शनिदेव की जय' म्हणत
शनिशिंगणापुर येथील स्वयंभू शनिमूर्तीला गंगाजल अभिषेक घालण्यात आला. साखरेची गाठी आणि कडे अर्पण करुन पाच जणांच्या उपस्थितीत गुढीपाडवा सोहळा संपन्न करण्यात आला.

कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून देवस्थान ट्रस्टने गुढीपाडवा यात्रा,कावड सोहळा व उदासी महाराज पारायण सप्ताह रद्द केला होता.परंपरा म्हणून मुख्य पुजारी अशोक कुलकर्णी यांनी प्रवरासंगम येथून आणलेल्या  गंगाजलने शनिमुर्तीला 
स्नान घालण्यात आले.शनि व हनुमान मुर्तीला साखरेचे कडे अर्पण करुन गाठीचा हार घालण्यात आला. 

कोरोना संसर्गाच्या संकटामुळे सलग दुस-या वर्षी गुढीपाडवा यात्रा रद्द करावी लागली. यामुळे ग्रामस्थ कावड मिरवणूकीपासून वंचित राहिले.मुख्य आरती सोहळ्यास महंत त्रिंबक महाराज,पुरोहित अशोक कुलकर्णी व अन्य तीन कर्मचारी उपस्थित होते.शनि चौथऱ्यास आकर्षण फुलांची सजावट करण्यात आली होती.बाहेरुन आलेल्या तुरळक भाविकांनी महाद्वार येथे लावलेल्या स्क्रीनवर शनिदर्शन घेतले. 

आज गुढीपाडवा असल्याने देवस्थानच्या वतीने अधिक बंदोबस्त ठेवून कुणालाच मंदीरात प्रवेश दिला नाही. परंपरा म्हणून फक्त पाच जणांच्या उपस्थितीत आरती सोहळा करण्यात आला.
- भागवत बानकर, अध्यक्ष,शनैश्वर देवस्थान

loading image