गडाखांमुळे शनिशिंंगणापूर ग्रामपंचायत बिनविरोध

विनायक दरंदले
Monday, 4 January 2021

देवस्थान ट्रस्टकरिता ग्रामपंचायत गटाने अर्ज भरले नव्हते, तर ग्रामपंचायतीसाठी देवस्थान विश्वस्त गटाने अर्ज भरले नव्हते. 

सोनई ः जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व माजी विश्वस्त बापूसाहेब शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापूर ग्रामपंचायत पंधरा वर्षांनंतर बिनविरोध झाली आहे. 
शनिशिंगणापूर येथे असलेल्या दोन राजकीय गटामुळे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीमध्ये नेहमीच राजकीय कलगीतुरा रंगायचा. याचा विकास कामांवर परिणाम होत होता.

मंत्री गडाख यांनी शनैश्वर देवस्थानसाठी गावातील मूळ रहिवासीच विश्वस्त होणार, अशी घटना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने पूर्ववत करून आणल्याने गावातील सर्व विरोधक एका छताखाली आले आहेत. 

हेही वाचा - माजी आमदार राहुल जगताप उतरणार जिल्हा बँकेच्या आखाड्यात

बिनविरोध सदस्य याप्रमाणे ः शिवाजी जगन्नाथ शेटे, कल्पना शरद देठे, कुसुम जालिंदर दरंदले, बेबी भीमराज बानकर, पुष्पा बाळासाहेब बानकर, स्वप्नील 
बाळासाहेब बोरुडे, वैशाली रमेश शेटे, बाळासाहेब बापूसाहेब कुऱ्हाट, राजेंद्र तुकाराम शेटे. 

देवस्थान ट्रस्टकरिता ग्रामपंचायत गटाने अर्ज भरले नव्हते, तर ग्रामपंचायतीसाठी देवस्थान विश्वस्त गटाने अर्ज भरले नव्हते. 

मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान ट्रस्टचे काम चांगले असून, त्यांनी ग्रामपंचायत विकास कामात महत्त्वाचे योगदान दिले आहे. 
- बापूसाहेब शेटे, मार्गदर्शक, ग्रामपंचायत 

बाहेरचे राजकारणी दिशाभूल करत असल्याने आम्ही युवक भरकटलो होतो. गडाखांमुळे नवीन विश्वस्त सर्वसमावेशक निवडले व ग्रामपंचायतही बिनविरोध झाली आहे. 
- बाळासाहेब कुऱ्हाट, नूतन सदस्य 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shanishinganapur Gram Panchayat unopposed due to Gadakhas