esakal | शनिशिंगणापुरात लटकू पुन्हा उतरले रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

In Shanishinganapur, Latku got back on the road

वाहनचालकास आमिष दाखवून वाहनाचा पाठलाग करीत आहेत. गावातही ते रस्त्यावर आडवे होऊन सक्ती करीत आहेत.

शनिशिंगणापुरात लटकू पुन्हा उतरले रस्त्यावर

sakal_logo
By
विनायक दरंदले

सोनई : शनिशिंगणापुरात सध्या कोरोना संसर्गाच्या भीतीने भाविकांची संख्या कमी आहे. त्यामुळे गावातील व्यावसायिकांमध्ये स्पर्धा वाढली आहे. मागील वर्षी बंद करण्यात आलेले "लटकू' आता वाहनांचा पाठलाग करण्यासाठी व रस्त्यावर वाहने अडविण्यासाठी पुन्हा सक्रिय झाले आहेत. 

कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन येथील मंदिर सलग आठ महिने बंद होते. दिवाळीच्या पाडव्याला दर्शनासाठी मंदिर खुले झाले. मात्र, गर्दीचा ओघ खूपच कमी आहे. शिर्डीत रेल्वेने भाविक येत नसल्याने, बेकायदा प्रवासी वाहतूक बंद आहे. 

हेही वाचा - लंके यांचे अण्णांनी केले कौतुक

गावातील पूजासाहित्याचे दुकानदार अडचणीच्या साडेसातीत आहेत. आर्थिक ताळमेळ बसण्यासाठी सक्तीची "लटकूगिरी' सुरू केली आहे. सोनई, घोडेगाव रस्त्यावर सध्या शंभरहून अधिक मोटारसायकलवरील "लटकू' कार्यरत आहेत.

वाहनचालकास आमिष दाखवून वाहनाचा पाठलाग करीत आहेत. गावातही ते रस्त्यावर आडवे होऊन सक्ती करीत आहेत. या प्रकाराकडे पोलिस व सुरक्षा विभाग लक्ष देत नसल्याने, भाविकांना त्रास सहन करावा लागतो. 
 
भाविकांची फसवणूक 
शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वाहनतळात चाललेल्या वाहनचालकाला "उधर कोविड सेंटर हैं' असा चकवा "लटकू' देत आहेत. पूजासाहित्याला मंदिरात परवानगी नसताना, "हे साहित्य महाद्वारात अर्पण करा; पुण्य लाभेल,' अशी बतावणी करून चक्क फसवणूक केली जात आहे.