इमामपूर घाटात सायकलने ७२ वेळा चढउतार करत 'एव्हरेस्टिंग'; सोनईतील तरुणांचा विक्रम

Sharad Kale from Sonai has cycled 72 times on Imampur Ghat.jpg
Sharad Kale from Sonai has cycled 72 times on Imampur Ghat.jpg
Updated on

सोनई (अहमदनगर) : सोनई येथील शरद काळे व इतर तीन युवकांनी पांढरीपुल येथील इमामपूर घाटात सलग छत्तीस तास सायकलवर घाट ७२ वेळा चढउतार करत एव्हरेस्टिंगची किमया पूर्ण केली आहे. अशी कामगिरी यापुर्वी देशातील १४४ जणांनी पूर्ण केली आहे. 

जगात यापुर्वी सोळा हजार जणांनी एव्हरेस्टिंग करण्याचा पराक्रम केलेला आहे. भारतात केवळ १४४ सायकलिस्ट युवकांनी एव्हरेस्टिंग केले आहे. सोनई येथील शरद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग मोकाटे, उदय टिमकारे, सागर काळे व शशिकांत आवारे यांनी एव्हरेस्टिंग मोहिममध्ये सहभाग घेतला होता. या विशेष कामगिरीनंतर या कार्याची नोंद जागतिक स्तरावरील 'हाॅल ऑफ फेम' मध्ये होणार आहे. 

जगात सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा अनेकांचे स्वप्न असते. मात्र ते सर्वांनाच शक्य होत नाही. यास पर्याय म्हणून माउंट एव्हरेस्ट उंचीचे अंतर एखाद्या टेकडी किंवा घाटात पायी अथवा सायकलिंगद्वारे चढ-उतार करून पूर्ण करण्यास एव्हरेस्टिंग म्हटले जाते. माऊंट एव्हरेस्टची ऊंची आठ हजार८८४ असून ही ऊंची पूर्ण करण्यासाठी काळे यांनी १२५ मीटर ऊंचीचा इमामपूर घाट ७२ वेळा सायकलवर चढउतार करत एव्हरेस्टिंग पूर्ण केले. यासाठी त्यांना सलग ३६ तास लागले.

सायकलिस्ट शरद काळे हे गेल्या तीन वर्षांपासून सायकलिंगमध्ये सुपर रेंडोरनअर आहेत. त्यांनी मोटारसायकलवर भारताच्या सुवर्ण चतुषकोनचे आव्हान पूर्ण  करताना मोटारसायकलवर मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई व पुन्हा मुंबई हा ७८८४ किमीचा प्रवास ८८ तासात पूर्ण केला होता. या विशेष कामगिरीची नोंद लिमका बुक इंडिया, इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड व वल्ड रेकाॅर्ड इंडियाने घेतली आहे. 

शनिवारी (ता.२७) रोजी सकाळी सहा वाजता सायकलवर घाट चढण्यास सुरुवात केली. आराम व झोप न घेता रविवारी दुपारी ३६ तासात विक्रम पूर्ण केला. उन्हाळा असल्याने मोठा त्रास सहन करावा लागला. जिद्द असेल काहीच अवघड नाही. 
- शरद काळे पाटील, सायकलिस्ट, सोनई 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com