शरद पवार यांनी नगरकरांसाठी दिली मोफत रेमडिसिवीर इंजेक्शन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 September 2020

हे इंजेक्‍शन सर्वसामान्य कोरोना रुग्णांना देण्यात येणार आहे. यासाठी अहमदनगर शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्याकडे सुपूर्त केले आहे.

नगर : नगर जिल्ह्यातील रेमेडिसीवर इंजेक्‍शनचा साठा संपल्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये होणाऱ्या इन्फेक्‍शनमुळे मृत्यू पावण्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे.

या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठनेते शरद पवार यांच्याकडे नगरकरांसाठी रेमेडिसीवर इंजेक्‍शनची मागणी केली होती. त्यानुसार शरद पवार यांनी तत्काळ मोफत रेमेडिसीवर इंजेक्‍शनचा साठा पाठवून दिला आहे.

नगर जिल्ह्यामध्ये रेमेडिसीवर इंजेक्‍शनचा साठा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी खासदार शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार सरकारने लगेच तत्काळ पुरवठा सुरु केला.

हे इंजेक्‍शन सर्वसामान्य कोरोना रुग्णांना देण्यात येणार आहे. यासाठी अहमदनगर शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्याकडे सुपूर्त केले आहे.

या वेळी नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, युवकचे अध्यक्ष अभिजित खोसे, वैभव ढाकणे, पराग झावरे, भुपेंद्र खेडकर, किरण रासकर आदी उपस्थित होते. 

दत्ता गाडळकर हे या क्षेत्रामध्ये चांगले काम करत असून, गरजूंपर्यंत हे इंजेक्‍शन पोहचवू शकतील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar gave free Remedicivir injection for Nagarkars