esakal | शरद पवार यांनी कांदा निर्यातबंदीत घातले लक्ष; मंत्री पियुष गोयल यांच्याशी ‘या’ विषयावर चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar holds discussion with Piyush Goyal on onion export ban

केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांदा उत्पादनाची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक बेल्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

शरद पवार यांनी कांदा निर्यातबंदीत घातले लक्ष; मंत्री पियुष गोयल यांच्याशी ‘या’ विषयावर चर्चा

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांदा उत्पादनाची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक बेल्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या भागातील विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याशी काल रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केली. त्यामुळे आज सकाळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांची परिस्थिती विशद केली.

आज (ता. १५) आमदार निलेश लंके यांनी पवार यांची के. के. रेंजसह कांदा निर्यात बंदी उठविण्याबाबत देखील निवेदन दिले. त्यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांनी यासबंधी माहीती दिली. पवार यांनी या बैठकीत प्रामुख्याने हे मुद्दे मांडले की, कांदा उत्पादक हा जिरायत शेतकरी आहे. त्याचप्रमाणे हा बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहे. तसेच जो कांदा आपण निर्यात करतो. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगली मागणी असते.

आजपर्यंत आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण केंद्र सरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची प्रतिमा आहे. त्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो. आणि या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारत हा निर्यातीच्या बाबतीत एक बेभरवशाचा देश आहे, अशी प्रतिमा बनण्याची शक्यता बळावते. ती आपल्याला परवडणारी नाही. या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना मिळतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करून कांदानिर्यातबंदीबाबत फेरविचार करावा अशी विनंती सन्माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना केली.

या विनंतीला अनुसरून पियुष गोयल यांनी सांगितलं की, हा कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडून आला असून बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर लोकांना कांदा महाग मिळू नये, यादृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांशी बोलून आम्ही पुन्हा एकदा या गोष्टीचा फेरविचार करू व जर एकमत झाल्यास याबाबतीत पुनर्निर्णय घेऊ असं केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी वनकुटेचे सरपंच राहुल झावरे, सभापती अण्णा सोडणार, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे उपस्थित होते. के. के. प्रश्नासंबंधी गुरुवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची जेष्ठ नेते शरद पवार भेट घेणार आहेत. या बैठकीत आमदार आमदार निलेश लंके उपस्थित राहणार आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर