esakal | ग्रामपंचायत विजयाचा फेसबुकवर मनसैनिकांचा जल्लोष पाहताच शर्मिला ठाकरेंनी बोलावलं मुंबईला
sakal

बोलून बातमी शोधा

Sharmila Thackeray calls Mumbai after seeing the victory of Gram Panchayat on Facebook

ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण  ढोरजे व बांगर्डे दोन ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे.

ग्रामपंचायत विजयाचा फेसबुकवर मनसैनिकांचा जल्लोष पाहताच शर्मिला ठाकरेंनी बोलावलं मुंबईला

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : तालुक्यातील ढोरजे व बांगर्डे या ग्रामपंचायती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात आल्या. त्यांचा जल्लोष फेसबुकवर पहिला आणि मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी या तरुणांना थेट पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्याची वेळ मिळवून दिली. या नव्या पदाधिकाऱ्यांनी थेट कृष्ण कुंज गाठले.
ठाकरे यांनी  तरुणांचे कौतुक करीत चांगले काम करून दाखवा, तुमचे अनुकरण दुसऱ्यांनी केले पाहिजे असा विकास साधा अशी कौतुकाची थाप टाकली.

तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण  ढोरजे व बांगर्डे दोन ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे. सरपंच पदांची निवड झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेसबुकवर राज ठाकरे यांच्या मनसेचा झेंडा श्रीगोंद्यात फडकविल्याच्या पोस्ट शेअर केल्या.

हेही वाचा - ठाकरेंसारखा सरळ माणूस मुख्यमंत्री होणं, हे आपलं भाग्यच

या तरुणांच्या पोस्ट शर्मिला ठाकरे यांनी पहिल्या आणि त्यांचे मोबाईल क्रमांक मिळविले. आणि अनपेक्षितपणे या तरुणांना थेट राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ कळविली गेली. रातोरात तरुणांनी मुंबई गाठली आणि त्यांच्या नेत्यांची भेट घेतली.
गावाच्या तरुणांनी थेट कृष्णकुंज गाठून आपल्या नेत्यांचे आशीर्वाद घेऊन नवनिर्माणासाठी पाठबळ मागितले.

ठाकरे यांनी त्यांना नुसती भेटच दिली नाही तर आस्तेवाईकपणे चौकशी करीत माहिती घेतली. तुमची विकासकामे पाहून हेवा वाटेल असे गावं घडवा. त्यासाठी काय लागेल ते सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी पक्ष तुमच्या नेहमी खंबीरपणे पाठीशी उभा राहील.

विकासाच्या नवनव्या संकल्पना राबविण्यासाठी  विविध विषयांचे अभ्यासक पक्षाचे नेते प्रवक्ते अनिल शिदोरे यांची थेट या ग्रामपंचायतींवर मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली. या गावांच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार करायला सांगून या गावांमध्ये विकासकामांचा श्रीगणेशा धुमधडाक्यात करा, असे सांगितले. 

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शेळके, तालुकाध्यक्ष अमोल कोहक, अतुल कोठारे, अनिल वाणी,अनिल टकले, रजनिकांत कोठारे, सचिन गावडे, संदिप ठवाळ  उपस्थितीत होते.

loading image