esakal | मढेवडगावच्या विकासाची 'ती' रणरागिणीIMadhewadgaon
sakal

बोलून बातमी शोधा

मढेवडगावच्या विकासाची 'ती' रणरागिणी

श्रीगोंदे : मढेवडगावच्या विकासाची 'ती' रणरागिणी

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : गावाची ओळख वेगळीच होती, पण त्यांनी महिला असूनही गावाला विकासाच्या दोरीत बांधत एकोपा तयार केला. नगर-दौंड महामार्ग गावातून जातो. त्यांनी पद्धतशीरपणे गावाला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गावची आता विकासात्मक ओळख करून देत, महिला असतानाही इतरांच्या तुलनेत काकणभर सरस काम करण्याचा प्रयत्न चालविला आहे मढेवडगावच्या अॅक्टिव्ह सरपंच अशी ओळख निर्माण करणाऱ्या महानंदा फुलसिंग मांडे यांनी.

साडेतीन वर्षांपूर्वी मांडे या गावाच्या पहिल्या अपक्ष लोकनियुक्त सरपंच झाल्या. गावात कारभाऱ्यांचे पक्षीय राजकारण सुरू असताना त्यांनी सहकाऱ्यांना सोबत घेत तिसरी आघाडी केली आणि त्यात त्यांना यश आले. पती प्रा. फुलसिंग मांडे यांनी गावाची वज्रमूठ बांधली. महानंदा मांडे यांच्यावरची गावविकासाची जबाबदारी वाढली.

हेही वाचा: Lakhimpur : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलाला अटक

महिलांचे संघटन करताना सहकारी सदस्यांना खूष ठेवण्याची दुहेरी जबाबदारी त्या कशा पेलतात, याकडे लक्ष होते. मात्र, त्यांनी ती लीलया पेलत एक वेगळा आणि विकासाचा सकारात्मक पायंडा पाडला. गावात नेहमीच्या योजना राबवितानाच, वेगळेपण काय देता येईल, याकडे त्यांचे सतत लक्ष असते. स्वच्छता अभियान राबविताना महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये उभारली. गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त केले. शिक्षणाचा दर्जा उंचावत पाच रुपये लिटरने शुद्ध पाणी गावाला उपलब्ध करून दिले. महिला बचतगटांचे सशक्तीकरण, गावातील अंतर्गत रस्ते, भूमिगत गटार योजना या सर्व विकासकामांमुळे गावाला स्मार्ट ग्रामचा दहा लाखांचा पुरस्कार, विशेष ग्रामस्वच्छता पुरस्कार मिळाला.

सरपंचपदाचे मानधन गावासाठी

महानंदा मांडे यांनी गाव सुधारत असताना प्रपंचही नेटका केला. दोन्ही मुले डॉक्टर केले. हे करीत असतानाच सरपंचपदाचे एक रुपयाही अनुदान घेतले नाही. हा सगळा निधी गावाच्या विकासासाठी त्या खर्च करतात. वेगळा पायंडा पाडत असताच त्यांनी गावातील महिला सदस्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी, मासिक सभांना त्यांच्या पतींना सभागृहात नो-एन्ट्री केली.

loading image
go to top