
गदेवाडी येथील एका उमेदवाराचे नातेवाईक संभाजी भुजंग मडके हे आज अर्जछाननीच्या वेळी चक्कर येऊन कोसळले.
शेवगाव : तालुक्यात 48 ग्रामपंचायतींच्या 408 जागांसाठी 1332 अर्ज दाखल झाले होते. छाननीत 36 अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, तथा तहसीलदार अर्चना भाकड यांनी दिली.
जातपडताळणी पावती नसणे, अपूर्ण अर्ज भरलेला असणे, बॅंक पासबूक नसणे, शौचालयाचा दाखला नसणे आदी कारणांमुळे 36 अर्ज अवैध ठरले. त्यात सर्वाधिक चापडगावात 6, कोनोशी- 6, वाडगाव-5, हातगाव-3 व ढोरजळगाव-ने येथील 3 अर्ज अवैध झाले. अर्ज मागे घेण्याची मुदत 4 जानेवारीपर्यंत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
गदेवाडी येथील एका उमेदवाराचे नातेवाईक संभाजी भुजंग मडके हे आज अर्जछाननीच्या वेळी चक्कर येऊन कोसळले. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना भाकड व नागरिकांनी तत्परता दाखवित, त्यांना तहसील कार्यालयाच्या वाहनात बसवून रुग्णालयात हलविले.