

Three youths die after a motorcycle collides head-on with a truck in Ghotan village near Shevgaon.
esakal
शेवगाव, : दिवाळी सणासाठी नवीन कपड्यांची खरेदी करण्यासाठी शेवगावकडे दुचाकीवरून निघालेल्या तीन युवकांचा दुचाकी व ट्रकच्या समोरासमोर झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेवगाव-पैठण रस्त्यावरील घोटण शिवारात ही घटना घडली.