शेवगावात मृत कोंबड्यांची लपवाछपवी, बर्ड फ्लूची भीती

In Shevgaon, dead hens were thrown into the river
In Shevgaon, dead hens were thrown into the river

शेवगाव : शहराजवळील ओढ्यात कोणीतरी मृत कोंबड्यांचे अवशेष, कुक्कुटपालनाची घाण टाकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली असून, नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाली आहे. विशेषत: बर्ड फ्लूच्या संसर्गाकडे दुर्लक्ष करून अशा प्रकारे मृत कोंबड्याची विल्हेवाट लावल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. 

शहराच्या पुर्वेकडील सोनमियॉं देवस्थान, अमरधाम, पैठण रस्त्यावरील नित्यसेवा वळणावरील नाल्यात, दहिफळ रस्त्यावरील स्मशानभूमीसमोर काही दिवसांपासून कुक्कुटपालन, चिकन व मटन व्यावसायिक मृत कोंबड्या, त्यांचे अवशेष व इतर घाण गोण्यांमध्ये भरून आणून टाकतात. ते मांस सडून व कुजून त्यांची दुर्गंधी सुटते. कुत्री व डुकरांचा त्यावर मुक्तसंचार सुरू असतो. त्याचा रहिवाशांना मोठा त्रास होतो. ही घाण विखुरल्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. 

वास्तविक, मृत पक्ष्यांचे अवशेष नष्ट करण्यासाठी ते खड्डयात पुरणे आवश्‍यक आहे. पालिकेनेही त्यासाठी जागा व यंत्रणा उपलब्ध करून द्यायला हवी. मात्र, याबाबत संबंधीत व्यावसायिक व पालिकाही गंभीर नसल्याचे दिसते.

ही दिवसांपासून चुकीच्या पद्धतीने उघड्यावर टाकलेल्या पक्ष्यांच्या अवशेषांमुळे आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे. राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून, अशा वेळी खालची वेस भागातील नदीत कोणीतरी गोण्यांमध्ये भरून मृत कोंबड्या आणून टाकल्या.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय फुंदे यांनी ही बाब पालिकेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पालिका प्रशासनाने खड्डा खोदून या गोण्या पुरल्या. 

शहरानजीकच्या रस्त्यावर व ओढ्या-नाल्यात सर्रास मृत पक्ष्यांचे अवशेष टाकल्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो. पालिकेने संबंधित व्यावसायिकांची नोंदणी व प्रबोधन करून योग्य त्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याबाबत काळजी घ्यावी. 
- दत्तात्रेय फुंदे, जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

संपादन - अशोक निंबाळकर

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com