मालमत्तांना टाळे! शेवगाव पालिकेकडून थकीत करवसुलीसाठी कारवाई सुरू

Shevgaon Municipality has started taking action for recovery of overdue taxes.jpg
Shevgaon Municipality has started taking action for recovery of overdue taxes.jpg

शेवगाव (अहमदनगर) : थकीत करवसुलीसाठी पालिका प्रशासनाने शहरातील मालमत्ता 'सील' करण्यास सुरवात केली आहे. नेवासे रस्त्यावरील दोन हॉटेल, तसेच पैठण रस्त्यावरील जिनिंग इमारत रविवारी 'सील' करण्यात आली. पालिकेच्या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. 

पालिकेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपली. त्यानंतर प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांची पालिकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. पदभार स्वीकारताच त्यांनी प्रमुख विभागप्रमुखांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. त्यात शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणावर थकीत कर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांना मालमत्ता 'सील' करण्याचा आदेश दिला.

घरकुलांच्या जागेचा तिढा सुटला; नगर जिल्ह्यात महाआवास अभियानास वेग,  223 घरांना जागा उपलब्ध
 
शहरातील नेवासे रस्त्यावरील 'हॉटेल संकेत'कडे 7 लाख 72 हजार रुपये, 'हॉटेल गारवा'कडे 59 हजार 411 रुपये, 'आनंद कॉटेक्‍स' या जिनिंग मीलकडे 3 लाख 88 हजार 789 रुपयांचा मालमत्ताकर थकीत आहे. त्यामुळे प्रशासनाने या तिन्ही इमारतींना रविवारी टाळे ठोकले. मुख्याधिकारी गर्कळ यांच्यासह करअधीक्षक डी. सी. साळवे, करनिरीक्षक डी. बी. कोल्हे, नगररचना विभागाचे एन. टी. खान, वसुली विभागाचे अशोक सुपारे, श्रीकृष्ण ढाकणे, संजय साखरे, गोपी छजलानी व अतिक्रमण विभागाचे व्ही. बी. लांडे यांनी ही कारवाई केली. 

शहरात मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर, पाणीपट्टीची थकबाकी आहे. नागरिकांनी त्वरित करभरणा करून सहकार्य करावे, अन्यथा मालमत्ता 'सील' करण्यात येईल. अनधिकृत नळजोड अधिकृत न केल्यास, फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा प्रांताधिकारी केकाण यांनी दिला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com