Shevgaon Vidhan sabha Election 2024sakal
अहिल्यानगर
Shevgaon Pathardi Assembly Election : मताच्या विभागणीवर विजयाचे गणित ठरणार! शेवगाव-पाथर्डीत राजळे, ढाकणे, घुले, काकडे निवडणुकीच्या रिंगणात
विधानसभा निवडणुकीसाठी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून १५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
शेवगाव - विधानसभा निवडणुकीसाठी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून १५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र, खरी लढत भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. प्रताप ढाकणे, अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले, अपक्ष हर्षदा काकडे, वंचित बहुजन आघाडीचे किसन चव्हाण या पाच जणांतच रंगणार आहे. मतदार संघातील प्रमुख राजकीय घराणे असलेल्या राजळे, ढाकणे, घुले, काकडे हे चौघेही विधानसभेसाठी आपले नशीब आजमावत असून यांच्यातील मताच्या विभागणीवर विजयाचे गणित ठरणार आहे.

