Gram Panchayat Election : शेवगाव तालुक्‍यात 843 जण उतरले रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

15 ग्रामपंचायतींमधील 32 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यात अधोडी येथे अवघ्या एका जागेसाठी निवडणूक होत आहे. बेलगावात सात पैकी पाच सदस्य बिनविरोध झाले.

शेवगाव (अहमदनगर) : तालुक्‍यातील 48 ग्रामपंचायतींच्या 408 जागांसाठी 1295 जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी 440 जणांनी माघार घेतल्याने 843 जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तालुक्‍यातील एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही. मात्र, 15 ग्रामपंचायतींमधील 32 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यात अधोडी येथे अवघ्या एका जागेसाठी निवडणूक होत आहे. बेलगावात सात पैकी पाच सदस्य बिनविरोध झाले.
 
हे ही वाचा : Gram Panchayat Election: अधिकारी अन्‌ कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण

बिनविरोध उमेदवार- अधोडी - विजय भीमराव पोटभरे, पांडुरंग दामोधर येवले, रुपाली रामेश्वर पोटभरे, राधाकिसन लक्ष्मण येवले, जयश्री सुगंध खंडागळे, रेखा कृष्णा पोटभरे, बेलगाव- मंगल ज्ञानेश्वर जाधव, गंगूबाई रामेश्वर गायके, अमृत नारायण जाधव, बंडू शहादेव लोहकरे, लक्ष्मीबाई विठ्ठल भारस्कर. सुलतानपूर बुद्रुक- रुख्मिणी सतीश धोंडे, मीरा बाळासाहेब जगदाळे, कल्याण कविता जगदाळे, दादेगाव- त्रिवेणी दादासाहेब देवढे, अमोल शंकरराव देवढे, शंकर भास्कर दारकुंडे. गदेवाडी- राणी नारायण मडके, सुनिता रोहिदास खंडागळे, बोडखे- आदिनाथ विनायक वेताळ, अयोध्या शंकर बर्डे. वाडगाव- आदिनाथ उत्तम धावणे, गीताबाई बप्पासाहेब ढाकणे, लखमापुरी- केशव रामराव गावंढे, अलका विष्णू थोरे, आखतवाडे- सुनिता सुभाष होडशीळ, खुंटेफळ- शोभा मच्छिंद्र खंडागळे, ताजनापूर- एकनाथ गायकवाड, ढोरजळगाव-ने- किशोर एकनाथ कराड, अंतरवली खु.शे.- सविता ज्ञानेश्वर कासुळे, राणेगाव- आशा संदीप वाघ, शेकटे बुद्रुक- महेश ताराचंद गरड.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In shevgaon taluka 843 candidates have entered the fray