
शिर्डी : बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर आज साईंच्या नगरीत भिक्षेकरी पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. पोलिस यंत्रणा, साईसंस्थान आणि नगरपरिषदेने संयुक्त कारवाई करून ८० भिक्षेकऱ्यांना पकडले. या सर्वांना न्यायालयासमोर हजर करून त्यांची रवानगी भिक्षेकरीगृहात केली जाणार आहे. दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर येथील सर्वच यंत्रणांना जाग आली. त्याचाच एक भाग म्हणून ही मोहीम राबविण्यात आली. यातील बहुतेक भिक्षेकरी हे विविध आजारांनी त्रस्त आहेत. बरेच जण व्यसनाधीन आणि दिव्यांग देखील आहेत. साईभक्तांकडून बऱ्यापैकी रोख रक्कम आणि खाद्यपदार्थ मिळत असल्याने भिक्षेकऱ्यांच्या दृष्टीने शिर्डी हे सर्वाधिक आवडते ठिकाण म्हणून नावारूपास आले होते.