Shirdi News : रूपवतेंनी बिघडवले गणित; शिर्डी मतदारसंघात विखे-थोरातांची प्रतिष्ठा पणाला

जनसंपर्कात सातत्य हा मुद्दा घेऊन वाकचौरे, तर महायुती सरकारच्या शक्तीच्या जोरावर लोखंडे, तर हे दोघेही निष्क्रिय, असा दावा करीत रूपवते मैदानात उतरल्या होत्या.
shirdi constituency lok sabha election vikhe-thorat vote
shirdi constituency lok sabha election vikhe-thorat vote Sakal

शिर्डी : ढगाळ हवामान आणि उष्णतेची काहीशी कमी झालेली लाट, यामुळे शिर्डी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ५२ टक्के मतदान झाले. अंतिम टक्केवारी साठ ते बासष्ट टक्क्यांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे, महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्यासह अन्य सर्व उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले.

या निवडणुकीत महायुतीकडून महत्त्वाची भूमिका बजावणारे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात (५७ टक्के), महाविकास आघाडीची धुरा सांभाळणारे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात (५८ टक्के), तर माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेवासे विधानसभा मतदारसंघात (५६ टक्के) मतदान झाले.

जनसंपर्कात सातत्य हा मुद्दा घेऊन वाकचौरे, तर महायुती सरकारच्या शक्तीच्या जोरावर लोखंडे, तर हे दोघेही निष्क्रिय, असा दावा करीत रूपवते मैदानात उतरल्या होत्या. विखे पाटलांचे होम ग्राऊंड असलेला शिर्डी, अकोल्यात आमदार किरण लहामटे व माजी आमदार वैभव पिचड,

तर कोपरगावात आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे हे महायुती समर्थक असल्याने शिर्डी, कोपरगाव व अकोल्यातून लोखंडेंना मताधिक्याच्या अपेक्षा आहेत, तर माजी महसूलमंत्री थोरातांचा संगमनेर, आमदार लहू कानडेंचा श्रीरामपूर आणि गडाखांचा नेवासे या तीन मतदारसंघातून वाकचौरेंना अपेक्षा आहेत.

कागदावर बरोबरीत भासणारा हा सामना रूपवते यांच्यामुळे तिरंगी झाला. त्या महाविकास आघाडीची हक्काची मतपेढी आपल्याकडे किती प्रमाणात आपल्याकडे वळवतील, याचा परिणाम या सामन्यावर होऊ शकतो. सायंकाळी पाचपर्यंत कोपरगाव (५३ टक्के), अकोला (५४ टक्के), तर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात (५४ टक्के) मतदान झाले.

संगमनेर, अकोला, श्रीरामपूर आणि नेवासे या चार मतदारसंघाचा कौल निर्णायक ठरेल. तेथे आम्ही आघाडीवर आहोत, असा दावा वाकचौरे समर्थक करीत आहेत, तर नेवासे आणि संगमनेर वगळता आम्ही अन्यत्र सर्व विधानसभा मतदारसंघात आघाडी घेऊ असा, दावा लोखंडे समर्थक करीत आहे.

प्रचारासाठी वेळ कमी मिळाला असला, तरी मतदारांचा प्रतिसाद आणि वंचितचा प्रभाव लक्षात घेता, यावेळी मतदार आपल्या पाठीशी उभे राहतील, असा दावा रूपवते यांनी केला आहे.

तापमान घटले, मतदान वाढले

आज सकाळपासूनच मतदारांनी बऱ्याच मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचे दृश्य पाहायला मिळाले. निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून घरोघर मतदार यादीतील नाव व क्रमांकाच्या चिठ्ठ्या पोहोच झाल्याने उमेदवाराच्या बूथवर मतदारांची गर्दी फारशी पाहायला मिळाली नाही. तुलनेत उष्णता कमी झाल्याने मतदानाचा टक्का वाढण्यास आणखी मदत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com