

शिर्डी : भाविकांची फसवणूक, लूटमार, धमक्या आणि वाटमारी, यामुळे शिर्डीपुरती बदनाम झाली. ही बदनामी आणि गुन्हेगारी थांबविण्यासाठी अधूनमधून प्रयत्न होतात. पोलिस सतर्क होऊन गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई सुरू करतात. ग्रामस्थ ग्रामसभा घेऊन एकाचवेळी गुन्हेगार आणि पोलिसांना इशारे देतात. सध्या कारवाई आणि इशारे दोन्ही सुरू आहेत. त्याबरोबरीने भाविकांची फसवणूक आणि वाटमारी देखील सुरू आहे. आज सकाळी एका अनिवासी दाम्पत्याला पाचशे रुपये किमतीचे पूजेचे ताट चार हजार रुपयांना विकून फसविण्यात आले. गेल्या महिनाभरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी भाविकांची वाहने अडवून लूटमार करण्यात आली.