
-सतीश वैजापूरकर
शिर्डी : दुचाकींची सातत्याने होणारी चोरी आणि चारचाकी वाहनांच्या काचा फोडून केली जाणारी चोरी, साईंच्या शिर्डीतील गुन्हेगारीचे एक प्रमुख अंग आहे. साईसंस्थान, नगरपरिषद आणि पोलीस यंत्रणा यांच्यातील सुसंवादाचा अभाव हे त्यामागचे प्रमुख कारण. शिर्डीचा वेगाने विस्तार झाला मात्र नियोजन आणि दूरदृष्टी नसल्याने सामान्यांना परवडतील, अशी सुसज्ज वाहनतळे उभारायची राहून गेली. त्याची शिक्षा साईभक्त आणि दररोज कामानिमित्त शिर्डीत येणारे सामान्य वाहनधारक निमुटपणे भोगत आहेत.