

Smooth & Strong: Shirdi Highway Upgradation Gets Major Push
Sakal
-सतीश वैजापूरकर
शिर्डी : मागील तीस वर्षांपासून देखभालीअभावी तीन-तेरा वाजलेला, खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत अनेकांचे बळी गेलेला आणि त्यामुळे सामान्य जनतेच्या रोषास कारणीभूत ठरलेल्या शिर्डी ते अहिल्यानगर महामार्गाची दैना आता फिटेल. वर्षभरात रस्ता गुळगुळीत अन् ठणठणीत होईल. सरत्या वर्षाची ही सर्वांत मोठी गुड न्यूज आहे. रस्त्याच्या कामाने वेग घेतला. जेथे डांबरीकरणाचा पहिला थर टाकून झाला, तेथे त्याचे रूपडे भलतेच पालटल्याचे दिसत आहे.