Shirdi Lok Sabha 2024: शिर्डीमध्ये शिवसेनेच्या गटांत रस्सीखेच; गेल्या सलग तीन निवडणुकांपासून सेनेचं वर्चस्व

Shirdi Lok Sabha 2024: मतदारसंघाच्या फेररचनेनंतर शिर्डी हा नवा लोकसभा मतदार संघ हा २००९ मध्ये स्थापन झाला व राखीव झाला. या निवडणुकीत शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला.
Shirdi Lok Sabha 2024
Shirdi Lok Sabha 2024esakal

Shirdi Lok Sabha 2024: मतदारसंघाच्या फेररचनेनंतर शिर्डी हा नवा लोकसभा मतदार संघ हा २००९ मध्ये स्थापन झाला व राखीव झाला. या निवडणुकीत शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला. त्यानंतर वाकचौरे कॉँग्रेसवासी झाले व लोकसभा कॉँग्रेसकडून लढविली. मात्र सदाशिव लोखंडे यांनी त्यांचा पराभव करून शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवले. २०१९ च्या निवडणुकीवेळी राजकीय समिकरणे बदलली.महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपत आले. या निवडणुकीत लोखंडे पुन्हा शिवसेनेकडून विजयी झाले.

२०१९ चे चित्र

खासदार सदाशिव लोखंडे (शिवसेना, विजयी) मते : ४,८६,८२०

भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस, पराभूत) मते : ३,६६,६२५

संजय सुखदान (वंचित बहुजन आघाडी) मते : ६३,२८७

ॲड.बन्सी सातपुते (सीपीआय) मते : २०,३००

विजयी उमेदवाराचे मताधिक्य- १,२०,१९५

Shirdi Lok Sabha 2024
Beed Lok Sabha 2024: मतांचे ध्रुवीकरण निर्णायक; पंकजा मुंडे विरूध्द शरद पवार उमेदवार देताना कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष

वर्चस्व

२००४ : ----

२००९ : शिवसेना

२०१४ : शिवसेना

२०१९ : शिवसेना

Shirdi Lok Sabha 2024
Ahilyanagar Lok Sabha 2024: अहमदनगरमध्ये डॉ. सुजय विखे विरुद्ध ‘मविआ’कडून पारनेरचे आमदार नीलेश लंके लढण्याची शक्यता

सद्य:स्थिती

शिवसेनेचे गेल्या सलग तीन निवडणुकांपासून वर्चस्व

शिवसेनेकडून (शिंदे गट) विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी

ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारीची शक्यता.

शिंदे गटाची भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भिस्त.

ठाकरे सेनेच्या उमेदवाराची काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर भिस्त

Shirdi Lok Sabha 2024
Raigad Lok Sabha 2024: रायगड शिवसेनेला मिळणार? महायुतीत मित्रपक्षाच्या नाराजीमुळे सुनील तटकरेंची सावध भूमिका

हे मुद्दे प्रभावी ठरणार

शिर्डी ते नगर महामार्गाचे रखडलेले काम

निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम जलद गतीने करण्याचे आव्हान

गोदावरी कालव्यांचे नुतनीकरण

पश्चिमेचे पावसाचे पाणी पूर्वेला वळवून गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढणे

शिर्डीच्या विकासाचा मंदावलेला वेग

Shirdi Lok Sabha 2024
Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha 2024: औरंगाबादमध्ये तिरंगी लढत चुरशीची होणार? वंचित सोबत नसल्याने एमआयएमला फटका बसण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com