Shirdi Saibaba : साई संस्थानला सोने ठेवण्यास जागा अपुरी; संपत्तीत अडीचशे कोटींची वाढ

साई संस्थानच्या तिजोरीत सुमारे ५०० किलो सोने साठले आहे. त्यात दागिने स्वरूपातील सोने अधिक आहे.
Shirdi Saibaba
Shirdi Saibabasakal
Updated on

शिर्डी - साई संस्थानच्या तिजोरीत सुमारे ५०० किलो सोने साठले आहे. त्यात दागिने स्वरूपातील सोने अधिक आहे. अलीकडच्या काही वर्षांत सोन्याच्या भावात दुपटीने वाढ झाल्याने या सोन्याने साई संस्थानच्या संपत्तीत तब्बल अडीचशे कोटी रुपयांची वाढ झाली. हे खरे असले तरी देणगी स्वरूपात येणारे हे सोने साठवायला सध्या जागा कमी पडते आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com