Corona Hospital | शिर्डीत कोविड रुग्णालय सुरू करा : लोखंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Hospital
शिर्डीत कोविड रुग्णालय सुरू करा : लोखंडे

शिर्डीत कोविड रुग्णालय सुरू करा : लोखंडे

शिर्डी : कोविडच्या (Corona virus) पहिल्या दोन्ही लाटांत विक्रमी रुग्णांवर मोफत उपचार करण्यात साईसंस्थानने राज्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता तिसऱ्या लाटेच्या(Covid third wave) पार्श्‍वभूमीवरही साई संस्थानने कोविड रुग्णालय सुरू करून सामान्य रुग्णांना दिलासा द्यावा. शासकीय यंत्रणेने कोविड लसीकरणास वेग द्यावा. ऑक्सिजननिर्मिती प्लँट(Oxygen Plant) सुसूत्रीकरणावर भर द्यावा, अशा सूचना खासदार सदाशिव लोखंडे (MP Sadashiv Lokhande) यांनी दिल्या.

हेही वाचा: मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल करावेत

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कोविड आढावा बैठक आज (बुधवार) येथे संपन्न झाली. तीत ते बोलत होते. यावेळी साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत, जिल्हा शल्यचिकित्सक रामटेके, राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे, शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, विजय जगताप, संजय शिंदे, सचिन कोते, अमोल गायके, डॉ. प्रमोद म्हस्के, साईसंस्थानचे प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे, डॉ. प्रीतम वडगावे, तसेच विविध तालुक्यांतील आरोग्याधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: पंजाबला खंबीर आणि निर्णयक्षम मुख्यमंत्र्याची आवश्यकता ; तिवारी

लोखंडे म्हणाले, की कोविड लसीकरणास वेग देण्यासाठी ग्रामपंचायतींपासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत सर्वांचे सहकार्य घ्यावे. त्यामुळे कमी वेळेत उद्दिष्ट पूर्ण करता येईल. उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालय व्यवस्थापनांच्या सहकार्याने कोविड रुग्णालये सुरू केली जावीत. मागील दोन्ही लाटांत ज्या कोविड कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती, त्यांना प्राधान्याने सेवेची संधी द्यावी. अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन पुरवठा, औषधांची उपलब्धता, या सर्वांचे नियोजन हाती घ्यावे. अडचण आल्यास आपण स्वतः त्यात लक्ष घालणार आहोत.

'साईसंस्थानने सुसज्ज कोविड रुग्णालय सुरू करावे, यासाठी आपण साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांच्याशी चर्चा केली. त्यांची भूमिका सकारात्मक आहे. साईसंस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनीही त्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगितले. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही पत्रव्यवहार केला आहे.'

- सदाशिव लोखंडे, खासदार

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top