सुकलेल्या फुलाने राहीबाईंचा सत्कार | Shirdi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुकलेल्या फुलाने राहीबाईंचा सत्कार

शिर्डी : सुकलेल्या फुलाने राहीबाईंचा सत्कार

शिर्डी : बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी गेल्या शुक्रवारी पद्मश्री पुरस्कार घेतला आणि नतमस्तक होण्यासाठी त्या विमानाने थेट शिर्डीला साईंच्या दरबारात दाखल झाल्या. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांनी त्यांचे साधी शाल व एक सुकलेले गुलाबपुष्प देऊन थंडे स्वागत केले. चहापान करण्याचे सौजन्य देखील दाखविले नाही. या अनपेक्षित प्रकाराने त्यांच्या सोबत असलेले स्थानिक पदाधिकारी अक्षरशः अवाक झाले.

हेही वाचा: औरंगाबाद : कुकची प्रेयसीच्या घरात आत्महत्या

हा प्रकार राहीबाई यांच्या लक्षात आला नाही. कारण त्यांना येथील काहीही माहिती नव्हती. त्यांच्यासोबत असलेले स्थानिक पदाधिकारी मात्र अस्वस्थ झाले. भुकेने व्याकूळ झालेल्या राहीबाई व कार्यकर्त्यांना ग्रीन अॅण्ड क्लिन शिर्डीच्या पदाधिकाऱ्यांनी नाश्ता व चहापान दिले.

‘तुम्ही तर त्यांना साधे पाणी देखील दिले नाही’, अशा शब्दात शिवसेनेचे पदाधिकारी सुनील परदेशी यांनी आपल्या मनातील खदखद आज समाजमाध्यमातून व्यक्त केली. संस्थानचा भरजरी ‘शताब्दी शाल’ घाऊक प्रमाणावर खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.

loading image
go to top