कुकची प्रेयसीच्या घरात आत्महत्या | Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

commits suicide

औरंगाबाद : कुकची प्रेयसीच्या घरात आत्महत्या

औरंगाबाद : हॉटेलात कुक म्हणून काम करणाऱ्या तरुणाने प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना शनिवारी (ता.१३) सायंकाळी सात वाजेच्‍या सुमारास न्यायनगरात उघडकीस आली. सुरुवातीला खुनासारखा वाटणारा हा प्रकार मृताच्या शवविच्छेदनानंतर आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

अमोलराजे भाऊसाहेब चव्हाण (वय ३२, रा. विष्णूनगर, जवाहर कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो सूतगिरणी चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होता. त्याच हॉटेलमध्ये त्‍याची प्रेयसीही साफसफाईचे काम करते. तेथेच त्‍यांची ओळख होऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ती न्यायनगरात राहते. तिचा पती दहा वर्षांपासून विभक्त राहत आहे. तिला १२ वर्षांची मुलगी आणि १४ वर्षांचा मुलगा आहे. अमोलराजे हा तिच्या घरी येत-जात होता.

हेही वाचा: नाशिक : बृहन्‍मुंबई पोलिस भरती परीक्षेला उमेदवारांचा प्रतिसाद

दरम्यान यावरून त्यांच्यात अनेकदा वाददेखील झालेला आहे. अशी माहिती नातेवाइकांनी दिली. शनिवारी दुपारी तीन वाजता अमोलराजे हा प्रेयसीच्‍या न्यायनगरातील घरी गेला. तेव्हा तिचा मुलगा एकटाच घरी होता. अमोलराजे याने मुलाला घराबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर आतून कडी लावून घेत त्याने गळफास घेतला.

संध्याकाळी सात वाजता ही घटना उघड झाली. प्रेयसीने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून अमोलराजे याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार राठोड करीत आहेत, अशी माहिती सहायक निरीक्षक शेषराव खटाने यांनी दिली.

loading image
go to top